

Nitin Gadkari Questions Delhi Green Tax, Signals Review of ECC Levy
esakal
नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत येणाऱ्या-जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर लावण्यात आलेल्या पर्यावरण भरपाई शुल्क (ईसीसी) (Environment Compensation Charge - ECC) रद्द करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या शुल्काच्या मुळ हेतू आणि गोळा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या वापराबाबत तीव्र प्रश्न उपस्थित केले.