
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आव्हान गांभीर्याने घेत मध्य प्रदेशातील उज्जैन येथील भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी काही महिन्यातच तब्बल ३२ किलो वजन कमी केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी बक्षीस म्हणून गडकरींकडून ३२ हजार कोटी रुपये मिळवले आहेत.(Nitin Gadkari loses challenge to Ujjain MP Anil Firojiya, must pay ₹32,000 crore now)
अनिल फिरोजिया यांचे वजन पूर्वी १३२ किलोच्या आसपास होते. फिरोजिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ चळवळ सुरू केली आहे. यावेळी वजन कमी केल्यास उज्जैनच्या विकासकामांसाठी प्रति किलो १ हजार कोटी मिळतील. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
गडकरींचे हे आश्वासन मी आव्हान म्हणून स्विकारलं. आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परिसराच्या विकासासाठी आतापर्यंत ३२ किलो वजन कमी केले आहे.
त्याचवेळी दिलेल्या आश्वासनानुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुमारे २३०० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत अनिल फिरोजिया यांना खास भेट दिली आहे.
गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल फिरोजिया यांना मी एक अट घातली आहे. माझं वजन त्यांच्यापेक्षा अधिक होतं. माझं वजन १३५ किलोग्रॅम होतं. आता माझं वजन ९३ किलो आहे. त्यामुळे अनिल फिरोजिया जितके किलो वजन कमी करतील तितके हजार कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघासाठी देईन. अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्यासाठी मी १ किलोग्रॅममागे १ हजार कोटी रुपये देईन. असे गडकरी यांनी म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.