गडकरींच्या मंत्रालयाने तोडला जागतिक विक्रम; 24 तासांत बनवला सर्वाधिक लांबीचा रस्ता

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 4 February 2021

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने पुन्हा एका रस्ते निर्माणामध्ये रिकॉर्ड बनवला आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने पुन्हा एका रस्ते निर्माणामध्ये रिकॉर्ड बनवला आहे. मंत्रालयातंर्गत येणाऱ्या एनएचएआयच्या एका ठेकेदाराने २४ तासात काँक्रीटचा सर्वाधिक लांबीचा रस्ता बनवण्याचा जागतिक रिकॉर्ड बनवला आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ग्रीनफील्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवे योजनेवर काम करत असताना ही उपलब्धी प्राप्त करण्यात आली आहे. 

एनएचएआयच्या ठेकेदाराने चार लेनच्या राजमार्गावर २४ तासात २५८० मीटर लांबीचा पावमेंट क्वालिटी काँक्रीट रस्त्या बनवण्याचा जागतिक रिकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ठेकेदाराने चार लेनच्या या राजमार्गावर २,५८० मीटर काँक्रीटचा रस्ता बनवण्याची सुरुवात १ फेब्रुवारी २०२१ ला सकाळी ८ वाजता केली, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता हे लक्ष्य पूर्ण करण्यात आले. त्यांच्या या कामामुळे जागतिक विक्रम झाला आहे. एनएचएआयचे ठेकेदार पटेल इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या या कामगिरीला इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्सला मान्यता दिली आहे. 

रिकॉर्ड ग्रीनफील्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवे परियोजनेचा भाग आहे. या रिकॉर्डला जगातील पूर्णपणे ऑटोमॅटिक अल्ट्रा मॉडर्ना काँक्रीट टाकणाऱ्या मशीने बनवलं आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षात सरकारने एप्रिल २०२० पासून १२ जानवारी २०२१ पर्यंत २६.१६ किमी. प्रतिदिनच्या गतीने जवळपास ८,१९६ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग निर्माण केला आहे. त्यातच मंत्रालयाने केलेला नवा रिकॉर्ड समोर आला आहे.

नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वातील रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. मागील आर्थिक वर्षात २६.११ किलोमीटरच्या गतीने जवळपास ७५७३ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात आला आहे. मंत्रालयाला आशा आहे की, या गतीने रस्त्याचे निर्माण झाल्यास ३१ मार्च २०२१ पर्यंत ११,००० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्याचे लक्ष्य साध्य केले जाऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin gadkari road transport ministry record building longest road