Nitin Gadkari: अर्धी मुलाखत पोस्ट करणं पडलं महागात! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवली कायदेशीर नोटीस

Nitin Gadkari Sends Legal Notices to Congress Leaders: नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Nitin Gadkari Sends Legal Notices to Congress Leaders
Nitin Gadkari Sends Legal Notices to Congress LeadersEsakal

Nitin Gadkari Sends Legal Notices to Congress Leaders: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाखतीचा काही भाग सोशल मिडीयावर पोस्ट करणं काँग्रेस अध्यक्षांना महागात पडलं आहे. नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा खोटा आणि दिशाभूल करणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केल्याबद्दल महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया टीमने काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

चुकीची माहिती पसरवण्याचा आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपने काँग्रेसवर केला आहे. या गोष्टी कोणत्याही किंमतीत खपवून घेतले जाणार नाही, असं महाराष्ट्र भाजपने म्हटलं आहे.

काँग्रेसने नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. गडकरी यांनी 'द लॅलनटॉप'ला दिलेल्या मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा १९ सेकंदाची व्हिडिओ काँग्रेस सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Nitin Gadkari Sends Legal Notices to Congress Leaders
Sakal Podcast : देशात ४८५ पैकी फक्त ४६ शहरांना पिण्यायोग्य पाणी ते आसारामला सुप्रीम कोर्टाचा दणका!

या व्हिडिओमध्ये आज गावातील गरीब, मजूर , शेतकरी दु:खी आहेत, नितीन गडकरी म्हणत असल्याचं दिसत आहेत. गावात चांगले रस्ते , पिण्यासाठी शुद्ध पाणी, चांगली रुग्णालये आणि चांगल्या शाळा नाहीत म्हणून दुःखी असल्याचं गडकरी म्हणत आहेत असं दिसत आहे.

हा व्हिडीओ आपल्या सोशल मिडीयावर शेअर करताना काँग्रेसने लिहिलं आहे की, ' मोदी सरकारचे मंत्री म्हणतात- आज शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी देण्याचे काँग्रेसचे वचन आहे. मोदी सरकारमध्ये गावे आणि आदिवासी भाग अडचणीत असल्याचे त्यांचे नेते म्हणत आहेत.

Nitin Gadkari Sends Legal Notices to Congress Leaders
Anant Ambani Pre-Wedding Video: "प्यार हुआ इकरार हुआ है..." मुलाच्या प्रीवेडिंगमध्ये रंगले मुकेश अन् नीता अंबानी, रोमँटिक Video Viral

'द ललनटॉप'मधील नितीन गडकरींची संपूर्ण मुलाखत पाहिल्यानंतर काँग्रेसने शेअर केलेल्या या अर्धवट व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. १ तास ४२ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये १५ मिनिटांनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बोलत आहेत. व्हिडिओमध्ये १५.२० ते १५.४५ च्या टाइमस्टॅम्प दरम्यान, नितीन गडकरींना शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न विचारला गेलाय. त्या प्रश्नाचे उत्तर गडकरी देत आहेत. दरम्यान आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप गडकरी यांच्याकडून करण्यात आला आहे.

Nitin Gadkari Sends Legal Notices to Congress Leaders
Election Commission: जात, धर्म अन् भाषेच्या आधारे मत मागणाऱ्यावर कारवाई होणार, लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोगाच्या कडक सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com