esakal | नितीन राऊत यांना ‘यूपी’त रोखले
sakal

बोलून बातमी शोधा

nitin-raut

आझमगड जिल्ह्यातील बांसा येथील दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या करण्यात आली.या घटनेच्या राज्यात व देशात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने या घटनेची दखल घेतली.

नितीन राऊत यांना ‘यूपी’त रोखले

sakal_logo
By
पीटीआय

लखनौ  - आझमगड जिल्ह्यातील दलित सरपंच सत्यमेव जयते यांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडालेली असताना आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणारे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आझमगड जिल्ह्याच्या सीमेवर रोखले. सरपंचांच्या कुटुंबीयास भेटण्यास मज्जाव केल्याने नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर धरणे आंदोलन केले. दरम्यान, कॉंग्रेसने ट्विट करत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आझमगड जिल्ह्यातील बांसा येथील दलित सरपंच सत्यमेव जयते ऊर्फ पप्पू राम यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या राज्यात आणि देशात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने या घटनेची दखल घेतली. त्यानुसार या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्याचे ठरवले. आज सकाळी नितीन राऊत हे चार्टर प्लेनने वाराणसीला पोचले. तेथून १०.०५ वाजता आझमगडकडे रवाना झाले. मात्र आझमगडच्या गौरा बादशहापूर सीमेवर नितीन राऊत यांचा ताफा अडवला आणि पुढे जाण्याची परवानगी नाकारली. यावेळी राऊत यांनी या कारवाईच्या निषेधार्थ समर्थकांसह धरणे आंदोलन केले. आंदोलनात माजी आमदार भगवती प्रसाद, राष्ट्रीय प्रभारी प्रदीप नरवाल देखील सहभागी झाले होते. पत्रकारांशी बोलताना, नितीन राऊत यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांवर अत्याचर होत आहेत. ही बाब केवळ मीच नाही तर एनसीआरबीचा अहवाल देखील सांगत आहे. या आधारावर उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून दलितांच्या हत्या वाढल्या आहेत, हे स्पष्ट होते. सत्यमेव जयते यांची हत्या ही दुर्देवी घटना आहे. यामुळे आपण आदित्यनाथ सरकारचा निषेध करतो, असे राऊत म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top