नितीशकुमारांनी बांधली झाडाला राखी 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इको पार्क येथे वृक्षारोपण आणि झाडांना राखी बांधली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी झाडांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. 

पाटणा : राखी पौर्णिमेनिमित्त बिहार सरकारच्या वतीने रविवारी वन संरक्षण दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इको पार्क येथे वृक्षारोपण आणि झाडांना राखी बांधली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी झाडांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. 

नितीशकुमार म्हणाले, की राखी पौर्णिमेनिमित्त आज बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या उज्ज्वल भवितव्याची कामना करते. तसेच पर्यावरण राखण्यासाठी एक तरी झाड लावावे. इथे रोपटे आणि राखी दोन्ही असून घरी वृक्षारोपण करावे आणि झाडांना राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची हमी द्यावी. 

Web Title: Nitish Kumar celebrates Rakshabandhan with tree