Nitish Kumar : नितीश कुमार NDA मध्ये गेले पण इंडिया आघाडीकडे आहे प्लॅन बी; काँग्रेस 'यांच्या' संपर्कात

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर आता बिहारमधील राजकीय स्थितीत बदल झाला असून ‘इंडिया’ आघाडी आता प्रामुख्याने यादव व मुस्लिम या मतांवर तसेच छोट्या पक्षांवर प्रामुख्याने ‘एनडीए’तील नाराज असलेल्या लहान पक्षांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
Nitish Kumar Rahul Gandhi
Nitish Kumar Rahul Gandhiesakal

नवी दिल्ली : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर आता बिहार मधील राजकीय स्थितीत बदल झाला असून ‘इंडिया’ आघाडी आता प्रामुख्याने यादव व मुस्लिम या मतांवर तसेच छोट्या पक्षांवर प्रामुख्याने ‘एनडीए’तील नाराज असलेल्या लहान पक्षांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

‘इंडिया’आघाडीमध्ये असताना नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूला १७ आणि राजदला १६ जागा देण्याची ठरले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार आता आघाडीतून निघून गेल्याने राजदला अधिक जागांवर आपले नशीब अजमावता येणार आहे. तर काँग्रेसलाही मुस्लिमबहुल मतदारांचा कौल घेता येईल.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राजदला एकाही जागांवर विजय मिळविता आला नव्हता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. त्यामुळेच राजद यावेळी २२ ते २५ जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस दहा ते बारा जागांवर निवडणूक लढेल, त्यात मुस्लिमबहुल संघाचा राहणार आहे. बिहारमध्ये आणि मुस्लिम मतांची एकूण संख्या ३१ टक्के आणि याचा फायदा राजद आणि काँग्रेस उचलण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

Nitish Kumar Rahul Gandhi
Mallikarjun Kharge : ''...तर आपल्या देशातली ही शेवटची निवडणूक ठरेल'', काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी व्यक्त केली 'ही' भीती

मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपसोबत आल्याने ‘एनडीए’मधील छोटे पक्ष नाराज झाले आहेत. या पक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न ‘इंडिया’ आघाडीतर्फे केला जात आहे. यात राष्ट्रीय लोक दलाचे उपेंद्र कुशवाह, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी आणि विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहानी यांना ‘इंडिया’ आघाडीसोबत घेण्याचा प्रयत्न राजद, काँग्रेसचे नेते करीत आहे. मुख्यमंत्री नीतिशकुमार आल्याने एलजेपीचे खासदार चिराग पासवान खूष नाहीत. बिहारमध्ये आता छोट्या पक्षांना सामावून घेण्याची तयारी सुरु झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com