विधानसभा अध्यक्षांवर नितीश भडकले

सत्ताधारी व विरोधक हैराण; घटनेनुसार काम करण्याची अपेक्षा केली व्यक्त
Nitish kumar flare up Assembly Speaker Vijay Kumar Sinha
Nitish kumar flare up Assembly Speaker Vijay Kumar Sinha sakal

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सोमवारी विधानसभेच्या अध्यक्षांवर भडकले. सभागृहात सर्वांसमोर अध्यक्षांना त्यांच्या मर्यादेची जाणीव ते करून देत असताना भाजपचे मंत्री व आमदार शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होते. विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा हे भाजपचे आहेत.

सिन्हा यांचा विधानसभा मतदारसंघ लखीसरायमध्ये काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांची हत्या झाल्याच्या प्रकरणात आज सभागृहात मंत्री बिजेंद्र यादव उत्तर देत होते. यावेळी सभागृहाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत नितीश कुमार अध्यक्षांना उद्देशून म्हणाले, की ते ज्याप्रकारे कामकाज हाताळत आहे, ते मला पटलेले नाही. सभागृहात घटनेनुसार काम करणे अपेक्षित असते. पण येथे परंपरांकडे काणाडोळा केला जात आहे. नितीश कुमार यांचा संताप पाहून अध्यक्षांसह भाजपचे आमदारही गप्प राहून त्यांचे बोलणे ऐकत होते.

सभागृहातील घडामोडी

लखीसरायमध्ये गेल्या काही दिवसांत नऊ जणांची हत्‍या झाल्याचे प्रकरणात मंत्र्यांच्या उत्तरावर भाजपचे आमदार संजय सरावगी यांनी पुरवणी प्रश्‍नोत्तराच्या वेळी सवाल उपस्थित केले. यातील काही घटनांमध्ये आरोपींना पकडणे शक्य झालेले नाही. यावर विजय कुमार सिन्हा यांनी मंत्र्यांना मुदत देत बुधवारी (ता. १६) पुन्हा उत्तर देण्याची सूचना केली. अध्यक्षांच्या कामकाजावर संतप्त झालेले नितीश कुमार यांनी सभागृहात येऊन अध्यक्षांवर भडकले. त्यांचा अनावर झालेला राग पाहून सभागृहातील सत्ताधारी व विरोधकही हैराण झाले. ‘अध्यक्ष त्यांच्या क्षेत्रातील घटनांवर अशा पद्धतीने मंत्र्यांना पुन्हा जवाब देण्यास उत्तरदायी ठरवू शकत नाही,’ असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण

नितीश कुमार यांच्या गर्जनेनंतर दहा मिनिटांनी अध्यक्षांनी त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण करून दिली. लोकशाहीत लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवला नाही, तर लोकशाहीची मुळे कमजोर होईल, असे वाजपेयी म्हणाल्याचे सिन्हा यांनी सांगितले. सभागृहात मुख्यमंत्री विरोधी अध्यक्ष असे जे चित्र रंगले होते, ते दीर्घकाळ लक्षात राहील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com