
नवी दिल्ली : बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. नितीश यांनी भाजपची साथ सोडली हे स्पष्ट झालं असून ते राष्ट्रीय जनता दलाला सोबत नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत. यावर आता लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांची प्रतिक्रिया आली आहे. (Nitish Kumar confirms that he has resigned as Bihar CM)
बिहारमध्ये भाजप-जेडीयू युती तुटताच चिराग पासवान अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. ते म्हणाले की, मी विधानसभा निवडणुकीपूर्वीच इशारा दिला होता की, निवडणुकीनंतर नितीशकुमार कधीही पलटू शकतात. आज तो दिवस आला असे वाटते.
चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये जर कोणी नितीश कुमारांना चांगले ओळखत असेल तर तो माणूस मी आहे. त्यांच्या उद्दामपणामुळे राज्याचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी चिराग यांनी आव्हान देत हिंमत असेल तर नितीश कुमार यांनी निवडणुकीला सामोरं जावं, असही म्हटलं.
यावेळी चिराग पासवान यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या घटनाक्रम सांगितलं. मी भाजपला सांगितले होते की, मला एकट्याने निवडणूक लढवायची आहे, नितीश कुमार यांच्यासोबत आपण कोणत्याही परिस्थितीत काम करू शकत नाही. नितीश कुमार यांनी केवळ माझ्या वडिलांचा अपमानच केला नाही, तर संपूर्ण बिहार अंधारात टाकल्याचे चिराग पासवान म्हणाले.
चिराग पासवान यांनी यावेळी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, नितीशकुमार यांची विश्वासार्हता शून्य आहे. बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हावी आणि राज्याने नव्याने जनादेश द्यावा अशी आमची इच्छा आहे. नितीश यांना विचारधारा आहे की नाही? असा सवाल करत पुढील निवडणुकीत JDU ला भोपळाही फोडणा येणार नाही, असंही पासवान यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.