Nitish Kumar bihar
esakal
देश
Nitish Kumar: नितीश कुमारांचा मुलगा होणार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री भाजपचा? पक्षाच्या मोठ्या नेत्याने दिले 'हे' संकेत
Nitish Kumar's Son Nishant Kumar Likely to Enter Politics: नितीश कुमार यांचा मुलगा निशांत यांच्याकडे मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमार हे राजकारणातून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
Bihar Politics: नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमार राजकारणात येणार असल्याची चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरु आहे. आता तर या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा यांच्या ताज्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. संजय झा म्हणाले की, निशांत यांनी राजकारणात यावं असं जेडीयूच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला वाटतंय. प्रत्यक्ष राजकारणात कधी यायचं, हे आता त्यांनीच ठरवावं.

