Bihar Politics : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमारच होतील. मोदींच्या नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : ‘आगामी विधानसभा निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारच शपथ घेतील,’’ असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास)प्रमुख चिराग पासवान यांनी सोमवारी व्यक्त केला.