
पाटणा : बिहार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही गोंधळाचे वातावरण होते. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी मतदारयादीच्या विशेष पडताळणी मोहिमेबाबत (एसआयआर)केलेल्या विधानादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हस्तक्षेप करीत तेजस्वी यांचे वडील लालूप्रसाद यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाची आठवण करून दिली.