Lok Sabha Election : विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पुढे ढकलली; नितीशकुमार यांची रणनीती

नितीशकुमार यांची रणनीती; शेवटच्या आठवड्यात शक्य
NitishKumar
NitishKumarsakal

पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यासंदर्भात रणनीती आखण्यासाठी येत्या १२ जूनला पाटण्यात बैठक बोलावली होती. मात्र बहुतांश विरोधी पक्षाचे मोठे नेते उपस्थित नसल्याने १२ जून रोजी होणारी बिगर भाजप पक्षाची बैठक पुढे ढकलली.

या बैठकीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे नितीशकुमार यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असल्याने कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याऐवजी पक्षाचे प्रतिनिधित्व अन्य नेते करतील,

असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री एम.जे. स्टॅलिन यांच्या ऐवजी द्रमुकचे प्रतिनिधींना पाठविण्यात येईल, असा संदेश दिला गेला. परंतु आता बैठक पुढे ढकलल्याने पक्षाचे महत्त्वाचे नेते हजर राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

NitishKumar
Chhagan Bhujabal यांचा Pankaja Munde यांच्या वक्तव्याला सर्मथन, | Gopinath Munde | BJP

बिगर भाजप पक्षांची मोट बांधणारे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचे आघाडीचे नेते सामील व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कारण संयुक्त बैठकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेते सहभागी झाल्यास या बैठकीचे गांभीर्य कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

परिणामी याचा लाभ भाजपला मिळेल. त्याचवेळी या बैठकीत बडे नेते सहभागी झाले तर विरोधकांच्या भूमिकेला लवकर आकार मिळेल, असे नितीशकुमार यांना वाटते. आता नव्या बदलानुसार ही बैठक या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होऊ शकते.

NitishKumar
Nitish Kumar : WhatsApp वरून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला सुरतमधून अटक

नितीशकुमार यांनी बिगर भाजप नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी पश्‍चिम बंगाल, दिल्ली, ओडिशा, झारखंड यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. कॉंग्रेस नेते खर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेत.

सुशीलकुमारांची टीका

नितीशकुमार यांच्या मोर्चेबांधणीवर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले, की बिगर भाजप दलाच्या मोर्चेबांधणीपासून नवीन पटनायक आणि के.सी.आर यांनी पूर्वीपासूनच चार हात लांब राहिले आहेत. नितीशकुमार हे भाजपविरुद्ध हारलेला डाव पुन्हा खेळत आहेत, असा आरोप केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com