esakal | भाजपमुळे कारवाई नाहीIBJP
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav

भाजपमुळे कारवाई नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखीमपूर : शेतकरी हत्याकांडातील आरोपींचा भाजपशी संबंध असल्यानेच त्यांना अटक करण्यात टाळाटाळ होते आहे, असा आरोप सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज केला. त्यांनी आज लखीमपूर येथे जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

लखीमपूरला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले की,‘‘समोर आलेल्या पुराव्यावरून संशयाची सुई केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाकडे वळत असतानाही त्याला अजून अटक झाली नाही. ‘एफआयआर’मध्ये नाव असलेल्यांना तुरुंगात टाकावे. त्यांच्यावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी. मिश्रा हे मंत्रिपदावर असेपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.’’ राज्यात समाजपवादी पक्षाचे सरकार आल्यास पीडितांच्या कुटुंबीयांना दोन कोटी रुपये आणि एका व्यक्तीस सरकारी नोकरी अशी मदत दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केली.

हेही वाचा: नोटाबंदी, कलम ३७० रद्द करुनही दहशतवाद थांबलेला नाही - राहुल गांधी

तृणमूल काँग्रेसनेही लखीमपूर घटनेवरून भाजपवर टीका केली आहे. दोषींना अद्यापपर्यंत अटक न करण्यामागे उत्तर प्रदेश सरकारचा काय हेतू आहे?, असा सवाल राज्यसभेच्या खासदार सुश्‍मिता देव यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींविरोधात काहीही लिहिले तरी पत्रकारांना अटक होते, पण शेतकऱ्यांची हत्या झाली तरी भाजप सरकार काहीही करत नाही, हे धक्कादायक आहे, असेही त्या म्हणाल्या.

उपोषणाला बसेन : सिद्धू

शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करावी, अशी मागणी करत काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज पंजाब ते लखीमपूर मोर्चाला सुरुवात केली. आरोपींवर शुक्रवारपर्यंत (ता. ८) कारवाई न झाल्यास उपोषणाला बसेन, असा इशाराही सिद्धू यांनी दिला आहे. सिद्धू यांचा मोर्चा मोहाली येथून सुरु झाला. मोर्चाला सुरुवात होताना पंजाबमधील अनेक मंत्री, आमदार आणि काँग्रेस कार्यकर्ते तेथे जमले होते. मुख्यमंत्री चरणसिंग चन्नी यांनीही हजेरी लावली. यानंतर सिद्धू आणि मोर्चातील इतर सहभागी वाहनांमधून लखीमपूरकडे रवाना झाले. त्यांचा मोर्चा उत्तर प्रदेश सीमेवर अडवण्यात आला. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आज केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी टीका केली. ‘राहुल हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. मात्र तरीही त्यांना कसे बोलावे, काय बोलावे, हे समजत नाही. पीडित कुटुंबाला न्याय निश्‍चितच मिळेल आणि त्यांनाही हे पटलेले असताना, ‘न्याय मिळायला हवा’ असे बोलण्यात काय अर्थ आहे?,’अशी टीका किशोर यांनी केली.

loading image
go to top