Alt News Zuber: पोक्सो गुन्ह्याप्रकरणी झुबेरला मोठा दिलासा! दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात मांडली भूमिका

झुबेरच्या एका ट्विटमुळं त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Alt News mohammad zubair
Alt News mohammad zubair esakal

नवी दिल्ली : ऑल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद झुबेरविरोधात दाखल पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार, झुबेरनं कोणंतही गुन्हेगारी स्वरुपाचं ट्विट केलेलं नाही, असं पोलिसांनी कोर्टात म्हटलं आहे. (No criminality found against Alt News co founder Zubair Delhi Police to HC)

Alt News mohammad zubair
Pandharpur: विठ्ठलाला अर्पण केलेले पोतंभर दागिने निघाले खोटे! काय घडलाय प्रकार वाचा

'लाईव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या काऊन्सिल नंदिता राव यांनी दिल्ली हायकोर्टात याप्रकरणी सुनावणीदरम्यान सांगितलं की, सन २०२० मध्ये झुबेरनं केलेल्या ट्विटनंतर झुबेरविरोधात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यानं केलेल्या ट्विटमध्ये त्यानं आपल्यावर टीका करणाऱ्या युजरचा फोटोचा स्क्रीनशॉट वापरला होता. यामध्ये झुबेरनं टीका करणाऱ्याला विचारलं होतं की, "आपल्या नातवाचं प्रोफाईल फोटो वापरलेला असताना अशा प्रकारे अपमानास्पद भाषा वापरणं योग्य आहे का? पण झुबेरनं हे करताना संबंधित अल्पवयीन मुलाचा फोटो अस्पष्ट केला होता"

Alt News mohammad zubair
Urfi Javed Case: सुषमा अंधारेंना चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, चार भिंतीच्या आत...

झुबेरनं नक्की काय ट्विट केलं होतं?

झुबेरनं आपल्यावर टीका करणाऱ्या युजरला उद्देशून लिहिलं होतं की, “नमस्कार जगदीश सिंग. तुमच्या गोंडस नातवाला तुमच्या सोशल मीडियावरील लोकांशी गैरवर्तन करण्याच्या अर्धवेळ नोकरीबद्दल माहिती आहे का? तुम्ही आपला प्रोफाईल फोटो बदलायला हवा असा मी तुम्हाला सल्ला देतो”

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

झुबेरवर कसा दाखल झाला गुन्हा?

झुबेरच्या या ट्विटनंतर संबंधित युझरनं झुबेरविरुद्ध दिल्ली पोलिसांकडं तक्रार दाखल केली आणि त्यानं आपल्या नातवाविरुद्ध सायबर लैंगिक छळाचा आरोप केला. या तक्रारीनंतर POCSO कायद्याच्या कलम 12 नुसार भादंविच्या कलम 509B आणि कलम 67 अंतर्गत झुबेरविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रसारित करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A लैंगिकरित्या स्पष्ट कृत्य असलेले साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करण्यासाठी शिक्षा असलेल्या झुबेरविरुद्ध अर्ज करण्यात आला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मे 2022मध्ये न्यायालयाला कळवले होते की, या प्रकरणात झुबेरवर कोणताही दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com