चीनच्या सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला पण...; राजनाथ सिंह यांचे लोकसभेत निवेदन

Rajnath Sinh
Rajnath Sinh

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन सैन्याच्या झटापटीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये पुन्हा एकदा भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले. यामध्ये ३० जवान जखमी झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आता यावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिलं. ('No death, no major injuries': Rajnath in Lok Sabha on LAC clashes)

Rajnath Sinh
Weather Alert : राज्यात येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस, बळीराजाच्या चिंतेत वाढ

राजनाथ सिंह म्हणाले की, अरुणाचलप्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये ९ डिसेंबर २०२२ रोजी PLA (पिपल्स लिबरेश आर्मी) ट्रुप्सने तवांग सेक्टरच्या यांग परिसरात घुसखोरीचा करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याच्या घुसखोरीचा भारताच्या सैन्याने निडरतेने प्रतिकार केला. यावेळी दोन्हीकडच्या सैन्यात संघर्ष झाला. भारतीय सैन्याने वीरतेने शत्रुच्या सैन्याला परत जाण्यास भाग पाडलं. या संघर्षात दोन्हीकडचे सैनिक जखमी झाले. मात्र एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नसून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

हेही वाचा सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Rajnath Sinh
McDonald : मॅकडोनाल्ड करणार तब्बल ५ हजार पदांची भरती; जाणून घ्या कुठे होणार बंपर भरती!

दरम्यान या घटनेनंतर लोकल कमांडरने ११ डिसेंबर रोजी एक फ्लॅग मिटींग घेतली. तसेच चीन सैन्याला अशाप्रकारे घुसखोरी करण्यास बंद करण्यास सांगितलं आहे. आपलं सैन्य सीमेची सुरक्षा कऱण्यास तत्पर असून सैन्याच्या वीरतेवर सर्वांना विश्वास असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com