
नागपूर : ‘‘विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा अपेक्षित होती. पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊनही घोषणा केली नाही. महायुतीचे सरकार हे गरीब, तरुण, शेतकऱ्यांचे नाही, तर मूठभर श्रीमंतांचे आहे.