

pharmacists give prescribe medicines in absence of doctors uttarakhand
sakal
उत्तराखंडमधील डोंगराळ आणि दुर्गम भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने आता फार्मासिस्टना काही ठराविक आजारांसाठी औषधे लिहून देण्याचा अधिकार देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यासाठी आरोग्य महासंचालनालयाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत असून, हिमाचल प्रदेश आणि आसाममधील पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली जाणार आहे.