भारतात कोरानाची चौथी लाट धडकणार नाही; तज्ज्ञांनी व्यक्त केला विश्वास

देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्यादेखील 50 हजारांच्या खाली नोंदवण्यात आली आहे.
Corona update
Corona updatesakal media

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट बऱ्याच अंशी घटल्याचे सकारात्मक चित्र पाहण्यास मिळत असून, देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्यादेखील 50 हजारांच्या खाली नोंदवण्यात आली आहे. या दरम्यान, भारतात कोरोनाची चौथी लाट धडकणार नसल्याचा विश्वास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या व्हायरोलॉजी सेंटरचे माजी संचालक डॉ. टी जेकब जॉन यांनी व्यक्त केला आहे. (No Fourth Wave Will Occur In India)

Corona update
ईडीनंतर आयटीची भानामती; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

भारतात कोरोनाची तिसरी लाट अंतिम टप्प्यात असून, भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नसल्याचा विश्वास असल्याचे जॉन यांनी सांगितले आहे. मात्र, जर कोरोनाचा एखादा नवीन व्हेरिएंट आल्यास चौथी लाट येऊ शकते. मात्र, नजीकच्या काळात तरी अशा प्रकारची लाट येईल अशी कोणतीही शक्यता दिसत नसल्याचे ते म्हणाले.

Corona update
Ukraine : ''अखेर सुमीत अडकलेल्या सर्व 694 भारतीय विद्यार्थांची सुटका''

महामारीचे रुपांतर स्थानिक स्वरुपात

गेल्या काही दिवसांपासून भारतासह राज्यातील कोरोना बाधित होणाऱ्या कोराना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी देशभरात 24 तासांत कोरोनाचे 3993 नवीन रुग्ण आढळून आले असून, ही आकडेवारी गेल्या 662 दिवसांतील सर्वात कमी असल्याचे नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाची तिसरी लाट कमकुवत होत असून, कमी होणाऱ्या या आकड्यांवरून महामारीचे रुपांत आता स्थानिक स्वरुपात झाले असल्याचे स्पष्ट होत असल्याचे जॉन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com