जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज नकोत; CBI च्या कर्मचाऱ्यांना आदेश

जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज नकोत; CBI च्या कर्मचाऱ्यांना आदेश
Updated on

मुंबई: आता सीबीआयचे अधिकारी अथवा स्टाफ सदस्य जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज वापरु शकत नाही. केंद्रीय तपास यंत्रणेचे (सीबीआय) नवे संचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी आपला पदभार स्विकारताच अधिकाऱ्यांसाठी अथवा स्टाफसाठी ड्रेस कोड निर्धारित केला आहे. सुबोध जायसवाल यांनी गेल्या बुधवारी सीबीआयचे 33 वे संचालक म्हणून पदभार स्विकारला आहे. सीबीआयच्या नव्या प्रमुखांनी आदेश दिला आहे की एजन्सीतील प्रत्येक अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालयामध्ये योग्य फॉर्मल पेहरावतच उपस्थित राहिल. त्यांनी म्हटलंय की, ऑफिसमध्ये जीन्स, टी-शर्ट्स आणि स्पोर्ट्सचे शूज चालणार नाही. (No jeans T shirts or sports shoes CBI asks staff to wear only formals)

जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज नकोत; CBI च्या कर्मचाऱ्यांना आदेश
महाराष्ट्रातील एकूण मृत्यू एक लाखाच्या पार; अर्धे मृत्यू दुसऱ्या लाटेतले

पुरुष अधिकाऱ्यांसाठी आदेश दिला गेला आहे की त्यांनी फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूजच घालावेत. इतकंच नव्हे, तर त्यांना व्यवस्थित दाढी करुनच ऑफिसमध्ये यावं लागेल. तर महिला अधिकारी अथवा स्टाफला फक्त साडी, सूट आणि फॉर्मल शर्ट परिधान करण्याचेच आदेश दिले गेले आहेत. सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मान्यतेने उपसंचालक (प्रशासन) अनूप टी मॅथ्यू यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं गेलंय की, ऑफिसमध्ये जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, चप्पल घालून येण्याची परवानगी नाहीये. आदेशात देशभरातील सीबीआयच्या सर्व शाखांच्या प्रमुखांना यासंदर्भात सुचना दिल्या गेल्या आहेत की या दिशा-निर्देशांचं सक्तीने पालन केलं जावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com