''भारताशिवाय जगातील कोणतीही मोठी समस्या सुटू शकत नाही'' | India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Lindner,

''भारताशिवाय जगातील कोणतीही मोठी समस्या सुटू शकत नाही''

नवी दिल्ली : जगातील कोणतीही मोठी समस्या भारताशिवाय सुटू शकत नाही, त्यामुळे भारत (India) हा महत्त्वाचा मित्र देश आहे, असे गौरोद्गार जर्मन फेडरल परराष्ट्र कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. टोबियास लिंडनर (Tebias Lindner) यांनी काढले आहेत. ते नवी दिल्ली येथे बोलत होते. (German State Minister Dr. Lindner On India )

लिंडनर म्हणाले की, आम्हाला भारतासोबत तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा आणि हवामान बदलाबाबत सहकार्य करायचे असून, भारताशिवाय कोणतीही मोठी समस्या सुटू शकत नसल्याचे ते म्हणाले. भारत हा एक महत्त्वाचा भागीदार असून, भारत-जर्मनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचेही डॉ. लिंडनर म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या बर्लिन दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करू असेही लिंडनर यांनी सांगितले.

Web Title: No Major Problem Can Be Solved Without India Says Dr Lindner Minister Of State Germany

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RelationsIndiaGermany
go to top