Alcohol Purchase Rules: मद्य खरेदीपूर्वी कोणतीही तपासणी बंधनकारक नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

District Collector Clarifies Rules for Alcohol Purchases: मद्य खरेदीबाबत मोठा खुलासा; तपासणी बंधनकारक नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
Alcohol Purchase Rules Clarified by District Collector No Mandatory Verification Required Before Buying Liquor

Alcohol Purchase Rules Clarified by District Collector No Mandatory Verification Required Before Buying Liquor

esakal

Updated on: 

दारू खरेदी करण्यासाठी आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आल्याचा दावा काही वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावरून प्रसारित होत आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि तथ्यहीन असल्याचे सागर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी अधिकृत निवेदन जारी करून जिल्हा प्रशासनाने या वृत्तांचे खंडन केले.

आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात वेळोवेळी राबवली जाणारी आरोग्य तपासणी ही नियमित वैद्यकीय प्रक्रिया आणि जनजागृती मोहिमेचा भाग आहे. तिचा मद्य खरेदीशी कोणताही संबंध नाही. दारू खरेदी करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी बंधनकारक करण्यात आलेली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...