मोदींच्या भाषणावर राहुल गांधीना आठवला जुना शेर; काय आहे तो शेर?

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे देशात पहिल्या लॉकडाऊननंतर सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी पाच महिने राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. मोदींच्या या संपूर्ण भाषणानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एका जुन्या शेरच्या माध्यमातून टीका केली आहे. 

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे देशात पहिल्या लॉकडाऊननंतर सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी पाच महिने राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. मोदींच्या या संपूर्ण भाषणानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एका जुन्या शेरच्या माध्यमातून टीका केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक जुना शेर आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत मोदींना टोला लगावला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. चीनने भारताचा बळकावलेला भूभाग आणि २० भारतीय जवांना पत्करावं लागलेलं हौतात्म्य यावरुन राहुल गांधींनी मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. 'तू इधर उधर की न बात कर, ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा, मुझे रहज़नों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है।' असा शेर राहुल गांधी यांनी पोस्ट केला आहे.
-------------- 
मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
--------------
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यातचं केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदीही घातली. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना चांगलंच लक्ष्य केलेले दिसून येत आहे. त्यानंतर आजच्या भाषणातूनही काँग्रेससह राहुल गांधीनीही मोदींच्या भाषणावर टीका केली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अजुनही वाढत आहे. अनलॉक २ च्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीयांशी संवाद साधला. या भाषणात नरेंद्र मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. यावेळी बोलत असताना मोदींनी अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन होताना दिसत नसल्याची खंत मोदींनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Mention Of China In PMs Address Rahul Gandhi Tweets Dig