कोरोनाबाबत अचूक अंदाज वर्तविणाऱ्या IIT कानपूरचा मोठा दावा; म्हटलं लग्न-पार्ट्या...

Corona virus
Corona virus esakal

जगभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. भारतातही संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झालाय. दरम्यान, आयआयटी कानपूरने सूचक वक्तव केले आहे. (No Need For Lockdown Or Booster Dose Says IIT Kanpur Claims Corona virus )

संसर्गाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी उच्चस्तरीय बैठक बोलावलीये. यादरम्यान कोरोना आणि संबंधित बाबींवर चर्चा केली जाणार आहे.

आरोग्य विभागानं आधीच एक अॅडव्हायझरी जारी करून लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान, आयआयटी कानपूरने घाबरू नये असे आवाहन केले आहे.

सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

कोरोनासंदर्भात अचूक भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी कानपूरने मोठे विधान केलं आहे. आयआयटीमधील प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात ९८ टक्के लोकांची कोव्हिडविरुद्धची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झाली आहे.

काही लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमकूवत असेल आणि एखादी छोटी किंवा मोठी लाट येईल. या शिवाय भारतात फार काही काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

तसेच, लग्न समारंभ, पार्ट्या, यांसारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची गरज नसल्याचेही आयआयटी कानपूरने म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com