
नवी दिल्ली - अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी नव्याने एफआयआर दाखल करण्याची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याचा अटकेच्या काही दिवसांनंतर एन्काउंटर झाला होता. या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.