
चौदा दिवसांत ६१ जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण नाही
नवी दिल्ली - देशात १४ दिवसांत ६१ जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नसून त्यात तब्बल चार जिल्ह्यांची भर पडली आहे. लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिममध्ये कोरोना १४ दिवसांपासून अदृश्य झाला आहे. दरम्यान, देशातून कोरोना कधी संपणार याची भविष्यवाणी वर्तवणे शक्य नसले तरी रुग्णसंख्या वेगाने वाढण्यासाठीचे पूरक वातावरण नाही. यापुढेही रुग्णसंख्या भयावह वेगाने वाढताना दिसणार नाही, असे निरीक्षण आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी नोंदवले. लॉकडाउनसह विविध उपाययोजनाकडून वेळीच केल्या गेल्या. त्यांचा परिणाम सध्याच्या स्थितीमध्ये देशभरात दिसून येत आहे, असे त्यांनी नुकतेच सांगितले होते.
गेल्या २८ दिवसांमध्ये राजस्थानच्या प्रतापगडमध्येही कोरोनाग्रस्त आढळलेला नाही, अशी माहिती केंद्राने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अगरवाल यांनी सांगितले, की देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८, ६०१ वर पोहोचली असताना बरे होणाऱ्यांची संख्या ३२५२ झाली आहे. चोवीस तासांमध्ये ७०५ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वेढ्यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण १७.४८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. देशभरात एकूण चार लाख ४९ हजार ८१० झाले असून एका दिवसात ३५ हजार ८६२ चाचण्या झाल्याचे सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रक्तदान अंकांमध्ये पुरेसा पुरवठा ठेवण्याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य सरकारांना केल्या आहेत. कोरोनाच्या नावाखाली इतर रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये असा सूचनावजा इशारा पुन्हा दिला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रेडक्रॉसचा मदत कक्ष
रेडक्रॉसने नवी दिल्लीमध्ये २४ तास रक्तपुरवठा असणारा मदत कक्ष सुरू केला आहे. याचे क्रमांक आहेत - ०११२३३५९३७९, ९३१९९८२१०४, ९३१९९८२१०५.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.