PK ने दिला सोनिया गांधींना अध्यक्षपदाबाबत मोलाचा सल्ला, म्हणाले...'

काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशांत किशोर यांनी पक्ष नेतृत्वासमोर नुकतेच प्रेझेंटेशन दिले आहे.
Sonia Gandhi and Prashant Kishor
Sonia Gandhi and Prashant Kishor Sonia Gandhi and Prashant Kishor

नवी दिल्ली : काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पक्ष नेतृत्वासमोर नुकतेच प्रेझेंटेशन दिले आहे. यामध्ये प्रशांत किशोर यांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेस अध्यक्ष (Congress Precedent) बनवण्याची सूचना केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, गांधी घराण्यातील सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या तीन सदस्यांपैकी कोणीही काँग्रेसचे अध्यक्ष होऊ नये, तर त्याऐवजी कुटुंबाबाहेरील नेत्यांपैकी एकाची काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करावी असा सल्ला किशोर यांनी दिला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर यांनी ज्येष्ठ आणि निष्क्रिय जुन्या नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची सूचनाही केली आहे. (Prashant Kishor News)

Sonia Gandhi and Prashant Kishor
मातोश्रीवर यायची कुणाची हिंमत नाही; मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुचवले आहे की, सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदी कायम राहावे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदीय मंडळाचे नेते व्हावे आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी. यासोबतच काँग्रेसने पूर्ण आक्रमकतेने आघाडीचे राजकारण करावे, असेही त्यांनी सूचनेमध्ये म्हटले असून, काँग्रेसने पूर्व आणि दक्षिणेतील दोनशे महत्त्वाच्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पूर्व आणि दक्षिणेतील या दोनशे जागांवर भाजपचे वर्चस्व नसल्याचे ते म्हणाले आहेत.

Sonia Gandhi and Prashant Kishor
नारायण राणेंनी एकेकाळी ठाकरेंच्या घराबाहेर जागता पहारा दिला होता..

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला आपल्या जुन्या वैचारिक पटलावर परत यावे लागेल, असा सल्लाही पक्षनेतृत्वाला दिला असून, देशाचा लोकशाहीवादी पक्ष म्हणून काम केले पाहिजे असे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करून बळकट करण्यावर भर देण्यावर काम करण्यास सांगितले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर यांनी ज्येष्ठ आणि निष्क्रिय जुन्या नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची सूचनाही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com