esakal | मृतांच्या आकड्यांवर चर्चा करण्यात अर्थ नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान
sakal

बोलून बातमी शोधा

मृतांच्या आकड्यांवर चर्चा करण्यात अर्थ नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान

मृतांच्या आकड्यांवर चर्चा करण्यात अर्थ नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाविरोधात लढाई सुरु आहे. हे आव्हान इतकं मोठं आहे की, सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण आहे. यासोबतच देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान देखील शासन आणि प्रशासनासमोर आहे. या काळातील परिस्थिती संयमाने हाताळण्याची आवश्यकता आहे. मात्र, भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांचं विधान सध्या वादग्रस्त ठरलं आहे. या विधानावर सध्या चर्चा सुरु आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री यांनी एक असं विधान केलंय ज्यामुळे हरियाणातील कोरोना संकटामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांबाबत ते गंभीर आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यांनी म्हटलंय की, ज्याचा मृत्यू झाला आहे तो आपल्या अशा दंगा माजवण्याने जिवंत होणार नाहीये. त्यामुळे मेलेल्यांच्या आकडेवारीवरुन चर्चा करण्यात काहीही अर्थ नाहीये, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे.

काय आहे विधान?

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलंय की, या कोरोना संकटात आपल्याला डाटासोबत खेळायचे नाहीये. लोक बरे कसे होतील, यावर आपल्याला आपलं लक्ष केंद्रीत करावं लागेल.

ज्याचा मृत्यू झाला आहे तो आपल्या अशा दंगा माजवण्याने जिवंत होणार नाहीये. त्यामुळे मेलेल्यांच्या आकडेवारीवरुन चर्चा करण्यात काहीही अर्थ नाहीये.

काय आहे हरियाणातील परिस्थिती?

काल सोमवारी हरियाणामध्ये तब्बल 11 हजार 504 लोकांना कोरोना झाला आहे. तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील मृतांची संख्या 3842 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 79 हजार 466 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यातील पॉझिटीव्हीटी रेट 6.07 टक्के आहे तर मृत्यूदर 0.88 टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: भयानक! जगाच्या 38 टक्के कोरोना रुग्ण एकट्या भारतात

अशी आहे देशातील परिस्थिती

गेल्या आठवड्यापासून भारतात दररोज ३ लाखापेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे भारताच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम नोंदविला गेला आहे. जगातील एकूण कोरोना संक्रमित लोकांमध्ये भारताचा वाटा ३८ टक्के एवढा आहे. भारतात सोमवारी (ता.२६) दिवसभरात ३ लाख २३ हजार १४४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ एवढी झाली आहे. सलग सहाव्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे.

loading image