
"भाजपाला हरवायचं असेल तर..."; प्रशांत किशोर यांचा राजकीय पक्षांना सल्ला
कोणतीही तिसरी किंवा चौथी आघाडी देशातल्या निवडणुका जिंकू शकत नाही, असं विधान रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. ते लवकरच काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा मधल्या काही काळात सुरू होत्या. मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचं विधान विशेष लक्षवेधी ठरत आहे.
प्रशांत किशोर यांनी सांगितलं की जर एखाद्या पक्षाला भाजपाला हरवायचं असेल तर त्या पक्षाला दुसरी आघाडी म्हणून पुढं यावं लागेल. २०२४ च्या निवडणुकांदरम्यान तिसरी आघाडी म्हणून पुढं येण्यासाठी तुम्ही ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची मदत करत आहात का, याबद्दल विचारलं असता प्रशांत किशोर यांनी उत्तर दिलं.
हेही वाचा: काँग्रेसला 'पीके'ची गरज नाही, पक्षात अनेक दिग्गज नेते आहेत - प्रशांत किशोर
ते म्हणाले, मला असं कधीच वाटत नाही की तिसरी किंवा चौथी आघाडी या देशात निवडणुका जिंकू शकेल. समजा भाजपा ही पहिली आघाडी आहे. तर तिला हरवण्यासाठी या देशामध्ये दुसरी आघाडी असणं गरजेचं आहे. जर एखाद्या पक्षाला भाजपाला हरवायचं असेल, तर त्याला दुसरी आघाडी म्हणून उदयाला येणं गरजेचं आहे.
काँग्रेस दुसरी आघाडी होऊ शकते का असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. काँग्रेस हा देशातला दुसरा सर्वात मोठा पक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Web Title: No Third Front Can Win Polls In India Only 2nd Front Can Defeat Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..