लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण

सध्या देशीतील अनेक ठिकाणी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत काम करत आहेत.
Corona Vaccine
Corona Vaccineesakal

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) कोणत्याही प्रकारच्या वेळेची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, असे केंद्राकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मानवी संसाधने आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेच्या आधारावर दररोज रात्री 10 वाजेपर्यंत काम करू शकतात, असे देखील केंद्राने म्हटले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे. सध्या देशीतील अनेक ठिकाणी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत काम करत आहेत. (Central Government On Covid 19 Vaccination Center Timings)

Corona Vaccine
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह; होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी (Union Health Ministry, Manohar Agnani) म्हणाले की, कोविड लसीकरण केंद्रे (CVCS) दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेतच काम करू शकतात, असा समज आहे. मात्र, लसीकरण केंद्रांसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. लसीकरण केंद्राच्या (Vaccination Center) वेळा लवचिक असून मानवी संसाधने आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेच्या आधारावर ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येऊ शकतात, असे अग्नानी म्हणाले.

Corona Vaccine
बर्फवृष्टीतही जम्मूत मुलांचं लसीकरण; पाहा व्हिडिओ

कोरोना नियमांचे पालन आवश्यक

दरम्यान, देशातील कोविड-19 रूग्णांची वाढती संख्या पाहता, अग्नानी यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व स्तरांवर कोविड नियमांचे पालन सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला आहे. (COVID Appropriate Behavior) तसेच लसीकरण केंद्रांवरील रांगा आणि प्रतीक्षा क्षेत्रात कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे का? याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Covid vaccination centers)

Corona Vaccine
कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष

बूस्टर डोस देण्यास सुरुवात

भारतात आजपासून (10 जानेवारी) आरोग्यसेवा कर्मचारी, निवडणूक ड्युटीसाठी तैनात कर्मचारी, फ्रंटलाइन कामगार आणि 60 आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना कोविड लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय 3 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांनादेखील लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com