
नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी असून पहाटेच्या वेळी पडणाऱ्या धुक्यामुळे असंख्य उड्डाणे आणि रेल्वे गाड्यांना विलंब होत आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुक्यामुळे आज सकाळी सुमारे दोनशेहून अधिक विमानांना उशीर झाला.