
ईशान्य भारतातील पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या 24 तासांत पूर आणि भूस्खलनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेश आणि मेघालयाच्या सीमेवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झालेल्या या पावसाने घरे उद्ध्वस्त झाली, मोठ्या प्रमाणात पूर आला आणि रस्त्यांवर भूस्खलन झाले.