esakal | मोदींच्या घोषणेनंतर ट्विटरवर ट्रेंड 'NoSir'

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

‘मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मोदींच्या घोषणेनंतर ट्विटरवर ट्रेंड 'NoSir'
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ‘येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केल्यानंतर ट्विटरवर समर्थकांकडून NoSir असा ट्रेंड चालविण्यात आला. या ट्रेंडसह सुमारे 50 हजार ट्विट करण्यात आले आहेत.

‘मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. डिजिटल इंडियाचा पाया रचणाऱ्या आणि सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या जागतिक नेत्यांपैकी एक नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते. महत्त्वाचे म्हणजे २०१४ मध्ये भाजपने सोशल मीडियाच्या आधारावरच निवडणूक जिंकली होती. मात्र, आता याच माध्यमातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे ट्विट मोदींनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसून, येत्या रविवारी ते यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते. 

त्यापूर्वीच त्यांच्या ट्विटवरून ट्विटरवर त्यांना असे न करण्यासाठी समर्थकांकडून ट्विट करण्यात येत आहेत. जगभरातील नागरिकांचे  तुमच्यावर प्रेम आहे. सोशल मीडियापासून तुम्हाला ब्रेक हवा असेल तर घ्या. पण, तुम्ही सोशल मीडिया सोडण्याचा विचार करू नका, #NoSir, असे ट्विट एका युजरने केले आहे.