केंद्रीय मंत्री शेखावत यांना नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gajendra shekhawat

केंद्रीय मंत्री शेखावत यांना नोटीस

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस बजावली आहे. २०२० मध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार झाल्याबाबत शेखावत यांनी वक्तव्य केले आहे. शेखावत यांनी गेहलोत यांचे विरोधक मानले जाणारे युवा नेते सचिन पायलट यांच्या नावाचा उल्लेखही केला आहे.

जयपूरमधील न्यायालयात एसीबीने फेरविचार याचिका सादर केली आहे. शेखावत यांच्या आवाजाच्या नमुन्यांच्या चित्रफिती मिळाव्यात अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. शेखावत यांना उत्तरासाठी १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. गेल्या वर्षी एसीबीची याचिका कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावली होती, मात्र या नव्या घडामोडीमुळे दोन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपने ऑपरेशन लोटसचा प्रयत्न केल्याचे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

जयपूरजवळील चोमू गावात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात शेखावत यांनी एक विधान केले होते. राजस्थानमधील सरकार बदलण्याची संधी पायलट यांनी हुकविली नसती तर पूर्व राजस्थान कालवा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी मिळाले असते, असे ते म्हणाले होते.

चित्रफितींवरून गदारोळ

पायलट यांनी २०२० मध्ये उपमुख्यमंत्री असताना गेहलोत यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यावेळी तीन चित्रफिती व्हायरल झाल्या होत्या. त्यानुसार काही बंडखोर नेत्यांनी भाजपच्या नेत्यांशी संवाद साधला होता. गेहलोत सरकार पाडण्यासाठी लाच देण्याबाबत त्यांची चर्चा चालली होती. हे आवाज शेखावत तसेच काँग्रेसचे आमदार भंवरलाल शर्मा, विश्वेंद्र सिंह यांचे असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.त्यानंतर काँग्रेस नेते महेश जोशी यांनी या चित्रफितींच्या आधारावर एसीबी तसेच स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) येथे प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) सादर केले होते.

गेहलोत आक्रमक

शेखावत यांना नोटीस बजावली जाताच मुख्यमंत्री गेहलोत आक्रमक झाले. सचिन पायलट यांच्या साथीत आपले सरकार पाडण्याचा शेखावत यांनी कट आखल्याचा आरोप त्यांनी केला. तुमच्या विधानावरून तुम्ही पायलट यांच्याशी संगनमत केल्याचे उघड होते, असे ते म्हणाले. शेखावत स्वतःचा चेहरा लपवित राहिले, पण अखेरीस त्यांना नोटिशीचा सामना करावाच लागला असे नमूद करून त्यांनी, आता त्यांना आवाजाच्या चित्रफिती देण्यात काय अडचण आहे, असा सवालही केला.

Web Title: Notice To Union Minister Shekhawat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rajasthancentral ministry
go to top