One Police, One Uniform: देशभरात आता 'एक पोलीस, एक गणवेश'? PM मोदींचं राज्यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

One Police, One Uniform: देशभरात आता 'एक पोलीस, एक गणवेश'? PM मोदींचं राज्यांना आवाहन

नवी दिल्ली : देशभरातील पोलीस व्यवस्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची सूचना केली आहे. त्यानुसार 'एक देश, एक पोलीस, एक गणवेश' ही व्यवस्था आणण्याबाबत राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांना त्यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (Now descuss on one police one uniform across country PM Modi appeal to states)

हेही वाचा: Abdul Sattar: सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'छोटे पप्पू' असा का केला? 'दारु प्रकरण' कृषीमंत्र्यांना भोवणार?

पोलीस हा राज्यसूची अतंर्गत असणारा प्रश्न आहे. त्यामुळं प्रत्येक राज्यानं आपापल्या पोलिसांसाठी वेगवेगळा गणवेश डिझाईन केलेला आहे. मात्र, 'एक देश, एक पोलीस, एक गणवेश' या संकल्पनेवर चर्चा सुरु व्हावी, असं आवाहन PM मोदी यांनी केलं आहे.

हेही वाचा: BCCI Gender Equality : चंदू बोर्डेनीं केलं जय शहांचे अभिनंदन; मोठं दिवाळी गिफ्ट मिळालं

दरम्यान, या व्यवस्थेचे फायदे देखील पंतप्रधानांनी सांगितले आहेत. ते म्हणाले, एकतर गणवेशासाठी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी गणवेशाचं कापड तयार होणार असल्यानं ते दर्जेदार असेल. त्याचबरोबर कॅप, बेल्ट यासाठी एकाच वेळी मोठी मागणी असेल. देशातील कोणताही नागरिक कोणत्याही भागात जाईल तेव्हा त्याला कळेल की, हा पोलीसवाला आहे. त्यामुळं 'एक पोलीस, एक गणवेश' ही संकल्पना महत्वाची आहे. फक्त त्यांच्या गणवेशावर संबंधित राज्याचा टॅग किंवा नबंर असू शकतो, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: Tata Airbus Project : उद्योग राज्याबाहेर का जातायत? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

यापूर्वी संरक्षण दलासाठी 'वन रँक, वन पेन्शन', 'एक नेशन, वन कार्ड', 'वन नेशन, वन गोल्ड रेट' ही सिस्टीमही केंद्राकडून लागू करण्यात आली आहे. तर काहींवर विचार सुरु आहे. यामध्ये आता 'वन नेशन, वन पोलीस, वन युनिफॉर्म' या योजनेचा समावेश होण्याची शक्यता आहे.