esakal | आता 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य विसरा : सुब्रमण्यम स्वामी
sakal

बोलून बातमी शोधा

sum.jpg

भारताचे राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) एप्रिल जून तिमाहीत 5 टक्क्यांवर आल्याने आता 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यस्थेचे लक्ष्य विसरा असे स्वामींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

आता 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य विसरा : सुब्रमण्यम स्वामी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहे दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्था 5 लाख कोटी अमेरिकी डॉलर (5 ट्रिलियन डॉलर) लक्ष्य आता गाठू शकत नाही. भारताचे राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) एप्रिल जून तिमाहीत 5 टक्क्यांवर आल्याने आता 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यस्थेचे लक्ष्य विसरा असे स्वामींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

स्वामी म्हणाले, की "लवकरच नवीन आर्थिक धोरण आणले नाही तर 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला गुड बाय म्हणावे लागेल'. देशभरात सध्या मंदीचे सावट आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विविध घोषणा केल्या होत्या. त्यानंतर सीतारामन यांनी सार्वजनिक बँकांच्या एकत्रीकरणाची मोठी घोषणा केली. थकीत कर्जे आणि लिक्विडिटीच्या विळख्यातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बाहेर काढण्यासाठी विविध बँकांना एकत्रित आणण्यात आले आहे. यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे आता 4 बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. म्हणजेच दहा बँकांना 4 बँकांच्या छताखाली आणण्यात आले आहे.

loading image
go to top