esakal | वीजटंचाईवरून केंद्र सरकार - दिल्ली सरकार आमनेसामने
sakal

बोलून बातमी शोधा

desh

वीजटंचाईवरून केंद्र सरकार - दिल्ली सरकार आमनेसामने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government) आणि दिल्ली (Delhi Gov) सरकारमध्ये आता वीज टंचाईवरून वाद होत आहे. दिल्ली अंधारात जाणार असल्याची भीती मंगळवारी केजरीवाल सरकारने व्यक्त केल्यानंतर बुधवारी केंद्राने वीजपुरवठ्याचे आकडे दिले.

कोळशाची टंचाई उद्भवल्याने देशभरात वीजटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात राजधानीच अंधारात जाणार असल्याचा दावा केजरीवाल सरकारने केला होता. त्याची तत्काळ दखल घेत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 'फॅक्टशीट' माध्यमांना दिले. त्यात म्हटले आहे, की दिल्लीच्या विजेची गरज ही ४६८३ मेगावॉट आहे.

हेही वाचा: नाशिक : मातोरी रोडवरील शेतकरी चार दिवसांपासून अंधारात

दिल्लीकडे ११ ऑक्टोबरला १०१.९ दशलक्ष युनिट वीज उपलब्ध होती. त्या तुलनेत मागणी ही १०१.१ दशलक्ष युनिट होती. गेल्या चौदा दिवसांतील विजेची उपलब्धता तेवढीच होती. सोमवारी गरजेपेक्षा वीज अधिक होती, असे दाखवत केंद्राने दिल्ली सरकारला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला.

loading image
go to top