धार्मिक वादाचा परिणाम भारताबाहेरही होतोय; अजित डोभाल यांचं मोठं विधान

more action will be taken against Pakistan says Ajit Doval
more action will be taken against Pakistan says Ajit DovalAjit Doval

नवी दिल्ली - भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून देशात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. शर्मा यांच्या विधानाचे पडसाद भारताबाहेर देखील उमटले होते. तर भारतात या मुद्दावरून आतापर्यंत तीन हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. देशातील वाढत्या धर्मिक हिंसेवर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी मोठं विधान केलं आहे. ते दिल्लीत बोलत होते. (NSA Ajit Doval news in Marathi)

more action will be taken against Pakistan says Ajit Doval
...तर देशाची नाचक्की झाली असती; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

डोभाल म्हणाले की, काही घटक भारताच्या प्रगतीला बाधा आणणारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते धर्म आणि विचारसरणीच्या नावाखाली तेढ आणि संघर्ष निर्माण करत आहेत. याचा संपूर्ण देशावर आणि देशाबाहेरही विपरीत परिणाम होत, असल्याचंही डोभाल यांनी म्हटलं. एआयएसएससी सईद चिश्ती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सईद चिश्ती म्हणाले की, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आम्ही निषेध करतो. काहीतरी करण्याची हीच वेळ आहे. कट्टरपंथी संघटनांना लगाम घालणे आणि त्यावर बंदी घालणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही कट्टरपंथी संघटना असोत, त्यांच्याविरुद्ध पुरावे असल्यास त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे सय्यद चिश्ती यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com