

Three workers died after a conveyor belt construction structure collapsed at NTPC's North Karanpura power plant in Jharkhand
esakal
झारखंड : झारखंडमधील चतरा जिल्ह्याच्या टंडवा येथील एनटीपीसीच्या नॉर्थ कर्णपुरा सुपर थर्मल पॉवर प्लांटमध्ये बुधवारी (१८ नोव्हेंबर) बांधकाम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली. कन्वेयर बेल्टचा निर्माणाधीन सांगाडा अचानक कोसळल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.