
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष वाढल्याने अणुबॉम्बच्या वापराची भीती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अणुशक्ती संपन्न शेजारी देश आहेत. अशा परिस्थितीत, जगाचे लक्ष त्यांच्यातील प्रत्येक हालचालीवर असते आणि पाकिस्तानकडून वारंवार अण्वस्त्रांच्या वापराची धमकी दिली जात असल्याने, या संघर्षाचे रूपांतर अणुयुद्धासारख्या भीषण परिस्थितीत होण्याची शक्यता वर्तवली जात होती.