esakal | दिलासादायक! देशात पहिल्यांदाच बरे झालेल्यांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

corona

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र ठरले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांच्या जवळ येऊन ठेपली आहे. 

दिलासादायक! देशात पहिल्यांदाच बरे झालेल्यांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा अधिक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात एक दिलासादायक वृत्त हाती आले आहे. देशात पहिल्यांदाच बरे झालेल्यांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं दिसत आहे. 

देशात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 76 हजारांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी देशात 9,985 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात 1 लाख 33 हजार रुग्णांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 1 लाख 35 हजार 206 रुग्णांनी कोरोना विषाणूवर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोरोना विषाणूपासून बरे होणाऱ्यांचा दर 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे ही देशाच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढत आहे. देशात कोरोनामुळे मृतांची संख्या 7,745 झाली आहे. गेल्या 24 तासास 279 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. वाढणाऱ्या मृतांची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे टाळेबंदी करुनही रुग्णसंख्या अटोक्यात आली नसल्याचं दिसत आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र ठरले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांच्या जवळ येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे राज्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत चीनलाही मागे टाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना विषाणू थैमान घालत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूने आतापर्यंत 3 हजारांपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तसेच मुंबई कोरोनाग्रस्तांचे देशातील सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. देशाने 4 कडकडीत टाळेबंदी अनुभवल्या आहेत. त्यानंतर जून महिन्यात सरकारने अनलॉक-1 च्या सत्राची सुरुवात केली आहे. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. मात्र, कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे देश पुन्हा टाळेबंदीच्या गर्तेत जाईल काय अशी भीती देशवासियांना वाटू लागली आहे.

loading image