मोदींच पाठबळ 'या' शहरातील पर्यटकांची संख्या वाढली 10 पट; पर्यटन विभागाची माहिती Tourism In India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varanasi

मोदींच पाठबळ 'या' शहरातील पर्यटकांची संख्या वाढली 10 पट; पर्यटन विभागाची माहिती

मोदी-योगी सरकारमध्ये बनारसला हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट मिळाली आहे. यासोबतच तेथील अनेक वास्तूंचे जतन आणि सुशोभीकरण केल्यामुळे देशातील आणि जगातील लोकांमध्ये काशीचे आकर्षण वाढले आहे. त्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने दिसून येत आहे. काशीमध्ये भारतीय पर्यटकांव्यतिरिक्त विदेशी पाहुण्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाराणसीत देशी पर्यटकांची संख्या दहापट वाढली आहे. जानेवारी 2017 ते जुलै 2022 पर्यंतची आकडेवारी पर्यटन विभागाकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये भारतीय पर्यटकांच्या संखेत अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय, कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून परदेशी पर्यटकांच्या हालचालीत ठप्प होते, त्यात यंदा झपाट्याने वाढ झाली आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पर्यटन उपसंचालक प्रीती श्रीवास्तव यांनी सांगितले की, 2022 मध्ये, जुलै महिन्यात वाराणसीला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या 40 लाख 3 हजार 288 आहे, जी जुलै 2017 मधील 4,61,650 पेक्षा जवळपास दहापट आहे. दुसरीकडे, परदेशी पर्यटकांची संख्या देखील कोरोनानंतर 174 पट वाढली आहे. 2022 मध्ये, 12,578 परदेशी पर्यटक जुलैमध्ये बनारसला पोहोचले, तर 2021 मध्ये ही संख्या फक्त 72 होती. आतापर्यंत केवळ जुलै 2022 पर्यंतची आकडेवारी पर्यटन विभागाने जाहीर केली आहे.

पर्यटन उद्योगाशी संबंधित आणि बनारस हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गोकुल शर्मा सांगतात की, चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटक वाराणसीसह अयोध्या, विंध्याचल आणि प्रयागराजला जात आहेत. सुट्ट्या, सण, उत्सवात काशीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली आहे. पर्यटन, वाहतूक सुविधांना बळ देण्यासाठी टेंट सिटी, रिव्हर फ्रंट, नमो घाट यासारखे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काशीसह वाराणसी आणि मिर्झापूर विभागातील पर्यटन उद्योगाला चालना मिळाली आहे.

उत्तर प्रदेशला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यात पर्यटन उद्योग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. योगी सरकारने राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास, कनेक्टिव्हिटी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने आणि उत्तम कायदा व सुव्यवस्था यामुळे राज्यात पर्यटकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जगाच्या पर्यटन नकाशावर झपाट्याने उदयास आलेले वाराणसी हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. याचे कारण म्हणजे वाराणसीचा सर्वांगीण विकास, रस्ते आणि उड्डाणपुलांचे जाळे, सुलभ पार्किंग, पर्यटकांसाठी सुविधा आणि मजबूत कायदा व सुव्यवस्था हे आहे.

याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसी आणि आसपासच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. श्रीकाशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनानंतर पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. याशिवाय गंगा आणि घाटांची स्वच्छता, गौतम बुद्धांच्या धर्मप्रचारस्थळ सारनाथचा विकास, गंगामधील समुद्रपर्यटन आदी महत्त्वाच्या बाबी पर्यटक वाढवण्यासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत.