OBC आरक्षणाचा मुद्दा तापला; चंद्रशेखर रावण पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲड. चंद्रशेखर आझाद
OBC आरक्षणाचा मुद्दा तापला; चंद्रशेखर रावण पोलिसांच्या ताब्यात

OBC आरक्षणाचा मुद्दा तापला; चंद्रशेखर रावण पोलिसांच्या ताब्यात

ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) मध्य प्रदेशमध्ये राजकारण तापलंय. रविवारी ओबीसी महासभेने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात निदर्शने करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घराला घेराव करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवारी सकाळी भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांना विमानतळावरून ताब्यात घेतलं. ओबीसी महासभेच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, अनेकांना नजरकैदेत ठेवलं आहे. त्यांच्या अटकेनंतर रावण यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

हेही वाचा: निवडणूक रणधुमाळीत बटाट्याने तापवलं राजकारण; प्रचारावरून औवेसींना सवाल

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसाकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त असून सीएम हाऊसकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. ओबीसी संघटनांनी 27% ओबीसी आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र आता निदर्शनं करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानं राजकारण तापलं आहे.

हेही वाचा: EWS आरक्षणाची ८ लाख उत्पन्न मर्यादा कायम, केंद्राची माहिती

राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करत शिवराज सरकारवर हल्लाबोल केला आहे. कमलनाथ म्हणाले की, पंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी महासभेने आज भोपाळमध्ये निषेधाची घोषणा केली होती. पण मला कळत नाही की शिवराज सरकार ओबीसी वर्गाला का टाळत आहे, सरकार त्यांच्या दडपशाहीकडे का वळले आहे?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Madhya Pradesh
loading image
go to top