"आधी स्वतःला सुशिक्षित करा अन् सिद्धांत बनवा"; डार्विन व आइन्स्टाइनच्या सिद्धांतावर आक्षेप घेणाऱ्यास कोर्टाने फटकारले

याचिकाकर्ते भगव्या वेशात कोर्टात आले होते
 theories of Charles Darwin and Albert Einstein
theories of Charles Darwin and Albert Einstein

नवी दिल्ली: चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला आव्हान देणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांनाच सुनावले. ‘तुम्ही आधी स्वतःलाच सुशिक्षित करा आणि स्वतःचा सिद्धांत तयार करा. आम्ही एखाद्याला प्रचलित सिद्धांत शिकण्यापासून मज्जाव करू शकत नाही,’ असे  न्यायालयाने सांगितले. (Supreme Court News)

न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशू धुलिया यांचा समावेश असलेल्या पीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली. भारतीय राज्यघटनेच्या ३२ व्या कलमांतर्गत ही रिट याचिका होऊ शकत नाही तसेच या माध्यमातून वैज्ञानिक तथ्यांना देखील आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाकडून नमूद करण्यात आले. 

उपरोक्त दोन्ही सिद्धांत हे चुकीचे असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. ही बाब लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी एका वेगळ्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता असल्याचा आग्रह देखील याचिकाकर्त्यांकडून धरण्यात आला होता. याबाबत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी त्याचा प्रचार करावा असे सांगितले.

 theories of Charles Darwin and Albert Einstein
Supriya Sule: पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागली, असा दिवस येईल वाटलं नव्हतं; सुप्रिया सुळेंची खंत

याचिकाकर्ते भगव्या वेशात न्यायालयात - 

याचिकाकर्ते राजकुमार हे आज भगवा पोशाख परिधान करून कोर्टामध्ये आले होते, शाळेमध्ये आपण शिकलेला डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आणि आइन्स्टाइनच्या सापेक्षातावादाचा सिद्धांत चुकीचा असल्याचे आता आपल्या निदर्शनास आले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

यावर न्यायालयाने तुम्हीच हे सिद्धांत सुधारून दाखवा, आता तुम्हाला जर हे सिद्धांत चुकीचे आहेत असे वाटत असेल तर न्यायालय यात काही करू शकत नाही. यामध्ये मूलभूत हक्काची कोठे पायमल्ली होते? असा सवालही न्यायालयाने केला.

 theories of Charles Darwin and Albert Einstein
Chandrakant Patil: "बारामती लोकसभा जिंकायची आहे"; पुणे पालकमंत्रीपद गमावल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com