

Odisha-Chhattisgarh-Assam Floods
esakal
भुवनेश्वर/रायपूर/गुवाहाटी: ओडिशा, छत्तीसगड आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून लाखो नागरिकांना त्याचा फटका बसला. ओडिशात चार जिल्ह्यांत पूरस्थिती अद्याप चिंताजनक असून महानदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने सखल भागांसाठी प्रशासनाने सजगतेचा इशारा दिला. छत्तीसगडमध्ये पूर आणि पावसाशी संबंधित घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर आसाममध्ये पूर ओसरत असला तरी सुमारे १३ हजार घरांची वीज अजूनही गायब आहे.