Fathers Memorial : मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्याच वडिलांचे स्मारक पाडण्याचा आदेश दिला

जनतेच्या सोयीसाठी स्वत:च्याच वडिलांचे स्मारक पाडण्याचे आदेश देऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देशात नवीन आदर्श निर्माण केला आहे.
odisha chief minister naveen patnaik
odisha chief minister naveen patnaiksakal
Updated on

भुवनेश्वर - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी २०१९ मध्ये आपले वडील व राज्याचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांची पुरीतील स्वर्गद्वार येथे असलेली समाधी स्मशानभूमीला अधिक जागा मिळण्यासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी हटविण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती पटनाईक यांचे स्वीय सहाय्यक व्ही. के. पांडियन यांनी दिली. जनतेच्या सोयीसाठी स्वत:च्याच वडिलांचे स्मारक पाडण्याचे आदेश देऊन पटनाईक यांनी देशात नवीन आदर्श निर्माण केला आहे.

मुख्यमंत्री पटनाईक यांच्यासोबत असणारे पांडियन यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, की ओडिशातील पुरी हिंदू धर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. पुरीमधील स्वर्गद्वार येथील स्मशानभूमीत आपल्या नातेवाइकांवर त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केल्यास त्यांना मोक्ष मिळतो, अशी अनेक भाविकांची भावना आहे. त्यामुळे, त्यांची नातेवाइकांवर पुरीतील स्वर्गद्वारमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असते.

odisha chief minister naveen patnaik
IAS Tina Dabi : पाकिस्तानातून आलेल्या १५० हिंदूंच्या घरांवर चालवला बुलडोझर; कलेक्टर टीना डाबी निशाण्यावर

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे वडील व राज्याचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांचे १७ एप्रिल १९९७ रोजी निधन झाले होते. त्यानंतर, पुरीतील स्वर्गद्वार येथे स्थानिक नागरी संस्थेने त्यांचे भव्य स्मारक उभारले होते. स्वर्गद्वारमधील मोठ्या जागेवर हे स्मारक उभारण्यात आले. मात्र, स्मारकामुळे स्मशानभूमीचा एक भाग बंद राहत असल्याचे लक्षात आल्यावर पटनाईक यांनी ते पाडण्याचा आदेश दिला.

वडिलांचे स्थान हृदयात

पांडियन यांनी स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना दाखविला. आपले वडील ओडिशातील लाखो लोकांच्या हृदयात असून ते कोणत्याही दगडात नाहीत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे, जनक्षोभ टाळण्यासाठी स्मारक सकाळीच पाडण्याची सूचनाही त्यांनी केली होती, अशी आठवणही पांडियन यांनी सांगितली. पुरीतील स्वर्गद्वार हा कायापालट होणारा पहिला प्रकल्प ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Takes Serious Note of RTI Violation by Kinwat Forest Official
Farmer’s Daughter Achieves CA Dream, Honors Late Father’s Wish
DK Shivakumar Net Worth
DK Shivakumar new Chief Minister of Karnataka
Marathi News Esakal
www.esakal.com