Mohan Charan : प्रदीर्घ काळानंतर मुख्यमंत्री निवासस्थान गजबजले
Odisha News : ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी तब्बल २५ वर्षांनी अधिकृत निवासस्थानात प्रवेश केला. पारंपरिक विधीनुसार दोन गायींसह गृहप्रवेश करत त्यांनी घरगुती समारंभ पार पडला.
भुवनेश्वर : ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान २५ वर्षांनी पुन्हा गजबजले आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी कुटुंबासह गुरुवारी या निवासस्थानी प्रवेश केला.