मुख्यमंत्री पटनाईक यांनी दिले 3 महिन्यांचे वेतन

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

ओडिशातीन पुरी नयागढ, जगतसिंहपूर, जयपूर, भद्रक, बालासोर, धेनकनाल, संबलपूर, झारसुगुडा या जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी 5 ऐवजी 14 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भुवनेश्वर : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांसाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपले तीन महिन्यांचे वेतन मदत म्हणून जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री पटनाईक यांनी सरकारी मदत निधीत आपले तीन महिन्यांचे वेतन जमा केले आहे, राज्यातील करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. करोनासारख्या आजाराचा सामना करणाऱ्यांसाठी मदत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त असामान्य परिस्थितीत सर्वांचा प्रतिसाद मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे,” असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच या विषाणूने ग्रस्त असलेल्या नागरिकांना सर्वांनी यासाठी मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ओडिशातीन पुरी नयागढ, जगतसिंहपूर, जयपूर, भद्रक, बालासोर, धेनकनाल, संबलपूर, झारसुगुडा या जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी 5 ऐवजी 14 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सकाळीपासून 29 मार्च रात्री 9 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Odisha CM Naveen Patnaik donates 3 months' salary to help those affected by CoronaVirus