Odisha Coromandel Express Accident: ओडिशा कोरोमंडल रेल्वे अपघातात 70 लोकांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी

ओडिशातील बालासोरजवळ दुर्घटना; घटनास्थळी बचाव पथके रवाना झाली
odisha coromandel express accident 350 injured 70 feared dead in odisha coromandel train accident reports police
odisha coromandel express accident 350 injured 70 feared dead in odisha coromandel train accident reports police sakal

बालासोर : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी सातच्या सुमारास दोन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला. या अपघातात 70 जणांचा मृत्यू झाला असून 350 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथके रवाना झाली असून अडकलेल्या प्रवाशांना डब्यांबाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

शालिमार- चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे दहा ते बारा डबे बालेश्वरजवळ घसरल्यानंतर ते शेजारील ट्रॅकवर कोसळले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी यशवंतपूर ते हावडा ही गाडी कोरोमंडल एक्सप्रेसच्या पडलेल्या डब्यांवर आदळली. त्यामुळे या गाडीचे देखील तीन ते चार डबे घसरल्याचे रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले.

ही धडक जोरदार झाल्याने किमान 70 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेत 350 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची संख्या अधिक असल्याने अनेक जणांना बसमधून रुग्णालयात नेल्याचे समजते. दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

बालासोर आणि नजीकच्या जिल्ह्यांतील वैद्यकीय पथके मदतीसाठी रवाना झाली आहेत. तूर्तास या मार्गावरील रेल्वे वाहतूक रोखण्यात आली असून या मार्गावरील काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. पंधरा रुग्णवाहिका मदत कार्यामध्ये सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून मुख्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत असे म्हटले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी महसूलमंत्री प्रमिला मलिक यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे रेल्वे विभागाने या गाड्यांची समोरासमोर धडक झाली नसल्याचे म्हटले आहे.

मोदींकडून दु:ख व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेतील पीडित व्यक्तींच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्या संपर्कात राहून बचावकार्यावर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com