

Cyclone Arnab Hits Odisha Flood Situation Worsens as Thousands of Residents Face Displacement and Rising Water Levels
sakal
भुवनेश्वर: चक्रीवादळ अर्णवमुळे झालेल्या मुसळधार पावसाने ओडिशातील गंजम आणि गजपती जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या जिल्ह्यांतील हजारो नागरिक २४ तासांहून अधिक काळ पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने बचाव आणि मदतकार्य तीव्र केले असून, दुर्गम भागांत अन्नाची पाकिटे हवाई मार्गाने टाकण्याची तयारी केली आहे. गंजम जिल्ह्यातील पात्रपूर येथे २४ तासांत ५४ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस त्या भागाच्या वार्षिक सरासरीपेक्षाही अधिक असल्याचे मुख्य सचिव अनु गर्ग यांनी सांगितले.